आपले खाते निष्क्रिय करण्याच्या पद्धती

X मधून बाहेर पडायचे आहे? आम्हाला समजले. सद्य परिस्थितीमध्ये काहीवेळा चार पावले मागे येणे केव्हाही चांगले. किंवा आपणास कायमस्वरूपी बाहेर पडायचे असल्यास आम्ही देखील आपणास मदत करू शकतो. आपले X खाते कसे निक्रिय करायचे—किंवा हटवायचे याविषयी आमच्या क्रमवार सूचनांचे अनुसरण करा.

नोट: आपल्या खात्यामध्ये समस्या असल्यास (उदा.चुकविलेल्या ट्विट्स, in, फॉलोअर किंवा फॉलो करत असलेल्यांची चुकीची संख्या,संशयास्पद थेट संदेश किंवा संभाव्य खाते तडजोड), खाते निष्क्रिय आणि पुन्हा सक्रिय केल्याने त्याचे निराकरण होणार नाही. कृपया आमच्या समस्यानिवारणावरील लेखांचा संदर्भ घ्या किंवा X समर्थन येथे संपर्क साधा.

 

आपले Twitter खाते हटवणे विरुद्ध निष्क्रिय करणे

आपले Twitter खाते निष्क्रिय करणे ही आपले खाते कायमस्वरूपी हटवण्याची पहिली पायरी आहे. निष्क्रियकरण 30 दिवसांपर्यंत टिकते. आपण 30-दिवसांच्या निष्क्रियकरण कालावधीमध्ये आपल्या खात्यामध्ये लॉगइन न केल्यास, आपले खाते हटवले जाईल आणि आपले उपभोक्ता नाव यापुढे आपल्या खात्याशी संबंधित राहणार नाही.
 

 

आपले Twitter खाते निष्क्रिय करणे

निष्क्रियकरणामुळे आपले Twitter खाते कायमस्वरूपी हटवण्याची प्रक्रिया सुरू होते. या पायरीमुळे 30-दिवसांची विंडो सुरू होते ज्यामुळे आपणास आपले खाते पुन्हा सक्रिय करायचे आहे किंवा नाही हे ठरविण्यास वेळ मिळतो.

आपले Twitter खाते निष्क्रिय करणे म्हणजे आपले उपभोक्ता नाव (किंवा "हँडल") आणि सार्वजनिक प्रोफाइल twitter.com, Twitter for iOS किंवा Twitter for Android यावर दिसणार नाही. 
 

 

आपले Twitter खाते हटवणे

आपल्या 30-दिवसांच्या निष्क्रियकरणानंतर, आपले Twitter खाते कायमस्वरूपी हटवले जाईल. जेव्हा आपण 30-दिवसांच्या विंडोमध्ये आपल्या खात्यामध्ये लॉग इन करत नाही, तेव्हा त्यावरून आम्हाला कळते की आपणास आपले Twitter खाते कायमचे हटवायचे आहे. एकदा आपण आपले खाते हटविल्यानंतर ते आमच्या सिस्टममध्ये उपलब्ध होणार नाही. आपण आपले पूर्वीचे खाते पुन्हा सक्रिय करू शकणार नाही आणि आपणास आपल्या कोणत्याही जुन्या ट्विट्स पाहता येणार नाहीत.

एकदा आपले खाते 30-दिवसांच्या निष्क्रियीकरण विंडोनंतर हटवले की, आपले उपभोक्ता नाव इतर Twitter खात्यांना नोंदणीसाठी उपलब्ध असेल.

 

आपले खाते निष्क्रिय करण्यापूर्वी जाणून घ्यायच्या प्रमुख गोष्टी

आपण Twitter खाते निष्क्रिय किंवा हटवण्याचे ठरवले असल्यास लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी खाली नमूद केल्या आहेत:

  • Google किंवा Bing सारख्या सर्च इंजिन साइट्सवर Twitter नियंत्रण ठेवत नसल्याने आपले Twitter खाते हटवल्याने अशा साइट्सवरील आपली माहिती हटवली जाणार नाही. शोध इंजिन साइट्सवर आपण संपर्क साधल्यास आपण पुढील प्रक्रिया करू शकता.
  • आपण आपले Twitter खाते निष्क्रिय केल्यानंतर इतरांच्या ट्विट्समध्ये आपल्या खात्याच्या उपभोक्ता नावाचा उल्लेख अजूनही अस्तित्वात असेल. तथापि, आपले प्रोफाइल यापुढे उपलब्ध राहणार नसल्याने ते (उपभोक्ता नाव) यापुढे आपल्या प्रोफाइलशी लिंक केले जाणार नाही. आपणास Twitter चे नियम अंतर्गत मजकुराचे पुनरावलोकन करायचे असल्यास, आपण येथे तिकीट फाईल करू शकता.
  • आपल्या Twitter खात्याशी संबंधित उपभोक्ता नाव किंवा ई-मेल बदलण्यासाठी आपणास आपले खाते हटवण्याची गरज नाही. कधीही ते अपडेट करण्यासाठी खाते माहिती येथे जा.
  • 30-दिवसांच्या निष्क्रियकरण विंडोमध्ये आपल्या खात्यामध्ये लॉगइन केल्याने आपले खाते सहजपणे पुनर्स्थापित होते.
  • आपणास आपला Twitter डेटा डाउनलोड करायचा असल्यास, आपणास खाते निष्क्रिय करण्यापूर्वी त्यासाठी विनंती करणे आवश्यक असेल. आपले खाते निष्क्रिय केल्याने Twitter सिस्टीममधून डेटा काढून टाकला जात नाही.
  • आपल्या प्लॅटफॉर्मची आणि Twitter वापरणाऱ्या लोकांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आपल्या निष्क्रिय केलेल्या खात्यावरील काही माहिती Twitter राखून ठेवू शकते. अधिक माहिती येथे मिळू शकते.
     

आपणास आपले Twitter खाते व्यवस्थापित करण्यात समस्या येत असल्यास, आपले Twitter खाते हटवण्याचे निवडण्यापूर्वी सामान्य समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी या टिप्स पहा.

 
आपले खाते निष्क्रिय करण्याच्या पद्धती
1 पायरी

नॅव्हिगेशन मेनू प्रतीक टॅप करा, नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.

3 पायरी

खाते निष्क्रियकरण माहिती वाचून नंतर निष्क्रिय करा टॅप करा..

4 पायरी

प्रॉम्प्ट केल्यानंतर आपला पासवर्ड प्रविष्ट करून नंतर निष्क्रिय करा टॅप करा.

5 पायरी

होय, निष्क्रिय करा टॅप करूनआपणास पुढील प्रक्रिया करायची आहे याची पुष्टी करा..

1 पायरी

सर्वात वरच्या मेनूमध्ये आपणास नॅव्हीगेशन मेनू प्रतीक किंवा आपले प्रोफाइल प्रतीक दिसेल. आपल्याकडे यापैकी जे प्रतीक असेल त्यावर टॅप करून नंतर सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.

3 पायरी

खाते निष्क्रियकरण माहिती वाचून नंतर निष्क्रिय करा टॅप करा..

4 पायरी

प्रॉम्प्ट केल्यानंतर आपला पासवर्ड प्रविष्ट करून नंतर निष्क्रिय करा टॅप करा.

5 पायरी

होय, निष्क्रिय करा टॅप करूनआपणास पुढील प्रक्रिया करायची आहे याची पुष्टी करा..

1 पायरी

अधिक प्रतीक टॅप करून नंतर ड्रॉप-डाउन मेनूमधून सेटिंग्ज आणि गोपनीयता टॅप करा.

3 पायरी

खाते निष्क्रियकरण माहिती वाचून नंतर निष्क्रिय करा क्लिक करा.

4 पायरी

प्रॉम्प्ट केल्यानंतर आपला पासवर्ड प्रविष्ट करा आणि खाते निष्क्रिय करा बटण दाबून आपणास पुढील प्रक्रिया करायची आहे याची पुष्टी करा.


X मध्ये लॉगइन न केल्याने आपणास चुकल्या चुकल्यासारखे वाटत असल्यास आणि 30 दिवसांपेक्षा कमी कालावधी झाला असल्यास केवळलॉग इन करून आपले खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी या पायऱ्यांचे अनुसरण करा.
 

 

सबस्क्रीप्शनन्स आणि खाते निष्क्रियकरण

आपले X खाते निष्क्रिय केल्याने X चे सबस्क्रीप्शन स्वयंचलितपणे रद्द होत नाही. आपल्याकडे X अनुप्रयोगावरून खरेदी केलेली कोणतीही सक्रिय सशुल्क सबस्क्रीप्शन्स (उदा. X Blue, सुपर फॉलो) असल्यास, ते सक्रिय राहतील. आपण ज्या प्लॅटफॉर्मचे मूळ सबस्क्रीप्शन घेतले त्या प्लॅटफॉर्मवरून आपण ही सबस्क्रीप्शन्स व्यवस्थापित करू शकता. आपण आपले खाते निष्क्रिय केल्यानंतर X.com वर खरेदी केलेली सदस्यता स्वयंचलितपणे रद्द होईल.

X Blue सबस्क्रीप्शन रद्द करण्याच्या पद्धती

सुपर फॉलो सबस्क्रीप्शन रद्द करण्याच्या पद्धती

 

निष्क्रियकरणाविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Twitter निष्क्रिय केल्याने माझे थेट संदेश देखील हटविले जातात का?

30-दिवसांच्या निष्क्रियकरण कालावधी दरम्यान आपले थेट संदेश हटवले जाणार नाहीत. जेव्हा निष्क्रियकरण कालावधी संपेल आणि आपले खाते हटवले जाईल, तेव्हा आपण पाठवलेले थेट संदेश देखील हटवले जातील.

मी माझे खाते निष्क्रिय केले, परंतु ते पुन्हा सक्रिय का होत आहे?

आपण आपल्या खात्यात प्रवेश करण्यासाठी कोणत्याही तृतीय-पक्ष अनुप्रयोग अधिकृत केले असल्यास, आपण अप्रत्यक्षपणे दुसऱ्या अनुप्रयोगावरून लॉग इन करत असाल. Twitter वर लॉग इन केल्याने आपले खाते स्वयंचलितपणे पुन्हा सक्रिय होते, खात्री करा आपल्या Twitter खात्यावरील तृतीय-पक्ष अनुपयोग प्रवेश रद्द करा.

मी निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करत असताना माझ्याकडे पासवर्ड नसेल तर काय करावे?

आपण खाते सहजपणे वापरू शकत नसल्यास, किंवा ते चुकीचे आहे असे आपणास संदेश मिळत असल्यास, आपणास आपला पासवर्ड रिसेट करावा लागेल. पासवर्ड रिसेट ई-मेलची विनंती करणे वापरून पहा.

मी पासवर्ड रिसेट ई-मेलची विनंती केली, परंतु मी माझे खाते सेट करण्यासाठी वापरलेला माझा ई-मेल पत्ता वापरू शकत नसल्यास मी काय करावे?

आपल्या Twitter खात्याशी कनेक्ट केलेल्या आपल्या ई-मेल पत्त्यावरील प्रवेश आपण गमावल्यास, आपणास आपल्या ई-मेल सेवा प्रदात्याशी संपर्क साधावा लागेल. आपल्या ई-मेल पत्त्याचा वापर करण्यासंदर्भातील मदत मिळवा. निष्क्रियकरण ही एक कृती आहे जी पुष्टी केलेल्या खातेधारकाने किंवा पुष्टी केलेल्या खातेधारकाच्या विनंतीनुसार करणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण पुष्टी केलेल्या ई-मेल पत्त्यावरून आमच्याशी संपर्क साधू शकत नाही (किंवा खात्यावरील सत्यापित मोबाइल क्रमांक वापरू शकत नाही), तोपर्यंत आम्ही आपल्यावतीने खाते निष्क्रिय करू शकत नाही. आपण आपला खात्यावरील सत्यापित मोबाइल क्रमांक वापरू शकत असल्यास आपण पासवर्ड रिसेट करण्याची विनंती करू शकता.

मी माझे लॉक किंवा स्थगित केलेले खाते कसे निष्क्रिय करू?

आपले स्थगित किंवा लॉक केलेले खाते निष्क्रिय करण्यासाठी, कृपया येथे विनंती सबमिट करा.विनंत्या आमच्या गोपनीयता धोरणाच्या "आमच्याशी कसा संपर्क साधावा" विभागात सूचीबद्ध केलेल्या संपर्कांना देखील पाठवल्या जाऊ शकतात.

आपण आपले खाते अनलॉक करण्यासाठी मदत देखील मिळवू शकता.अपील फाइल करण्यासहित आपले लॉक किंवा स्थगित खाते व्यवस्थापित करणे याविषयी अधिक माहिती मिळवा.

हा लेख शेअर करा