माझ्या खात्याशी तडजोड झाली आहे का?
आपल्याला:
- आपल्या खात्याकडील अनपेक्षित पोस्ट्स लक्षात येणे
- आपल्या खात्यावरून पाठवलेले अनपेक्षित थेट संदेश दिसणे
- आपण न केलेली किंवा मंजूर न केलेली इतर खाते वर्तने लक्षात येणे (जसे की फॉलो करणे, अनफॉलो करणे किंवा अवरोधित करणे)
- आपल्या खात्याशी तडजोड झाली असू शकते असे सांगणारे सूचनापत्र आमच्याकडून मिळणे
- आपल्या खात्याची माहिती बदलली आहे आणि ती आपण बदललेली नाही असे सांगणारे सूचनापत्र आमच्याकडून मिळणे
- आपला पासवर्ड आता काम करत नाही आणि आपणास तो रिसेट करण्यासाठी सूचित केले जात आहे हे लक्षात येणे
आपण वरीलपैकी कोणत्याही एका पर्यायाला होय असे उत्तर दिले असल्यास, कृपया खालील पायऱ्यांचे अनुसरण करा:
1. आपला पासवर्ड बदला
कृपया सेटिंग्जमधील पासवर्ड टॅबमधून आपला पासवर्ड त्वरित बदला. आपण जर लॉग आउट केले असेल तर लॉगइन वर जा आणि आपला पासवर्ड रीसेट करण्यासाठी पासवर्ड विसरला वर क्लिक करा. कृपया आपण पूर्वी वापरलेला नाही असा एक मजबूत पासवर्ड निवडा.
2. आपला ई-मेल पत्ता सुरक्षित असल्याची खात्री करा
आपल्या खात्याशी संलग्न केलेला ई-मेल पत्ता सुरक्षित असल्याची आणि त्याचा वापर करणारे आपण एकमेव असल्याची खात्री करा. आपण आपल्या >x< अनुप्रयोगावरून (iOS किंवा Android) किंवा >x<.com वर लॉग इन करून आणि खाते सेटिंग्ज टॅबला भेट देऊन आपला ई-मेल पत्ता बदलू शकता. आपला ई-मेल पत्ता अपडेट करण्याच्या सूचनांसाठी हा लेख पहा आणि अतिरिक्त ई-मेल खाते सुरक्षा टिप्ससाठी हा लेख पहा.
3. तृतीय-पक्ष अनुप्रयोगांची कनेक्शन्स रद्द करा
लॉग इन असताना आपल्या सेटिंग्जमध्ये अनुप्रयोग येथे भेट द्या. आपण ओळखत नसलेल्या कोणत्याही तृतीय-पक्ष अनुप्रयोगासाठी प्रवेश रद्द करा.
4. आपल्या विश्वसनीय तृतीय-पक्ष अनुप्रयोगांमध्ये आपला पासवर्ड अपडेट करा
एखाद्या विश्वासार्ह बाह्य अनुप्रयोगावरून आपला >x< पासवर्ड वापरला जात असल्यास त्या अनुप्रयोगामध्ये आपला पासवर्ड निश्चितपणे अपडेट करा. अन्यथा, अयशस्वी लॉगइन प्रयत्नांमुळे आपणास आपल्या खात्यामधून तात्पुरते लॉक आउट केले जाऊ शकते.
आपले खाते आता सुरक्षित असले पाहिजे आणि यापुढे आपणास अनपेक्षित खाते वर्तन दिसता कामा नये. आपणास अजूनही समस्या येत असल्यास, कृपया मदतीसाठी समर्थन विनंती सबमिट करा.
5. आपणास अजूनही मदत हवी असल्यास समर्थनाशी संपर्क साधा
पासवर्ड रीसेट करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपण अजूनही लॉग इन करू शकत नसल्यास, समर्थन विनंती सबमिट करून आमच्याशी संपर्क साधा. तडजोड झालेल्या आपल्या >x< खात्याशी संबंधित ई-मेल पत्ता वापरल्याची खात्री करा; त्यानंतर आम्ही त्या ई-मेल पत्त्यावर अतिरिक्त माहिती आणि सूचना पाठवू. आपली समर्थन विनंती सबमिट करताना कृपया आपले उपभोक्ता नाव आणि आपण आपल्या खात्यामध्ये शेवटचे लॉग इन केल्याची तारीख, या दोन्ही गोष्टी समाविष्ट करा.
आपण आपल्या >x< खात्याशी संबंधित ई-मेल खात्याचा प्रवेश गमावल्यास, आपण काय करू शकता याविषयी अधिक जाणून घ्या.
सोप्या पद्धतीने खबरदारी घेऊन आपले खाते सुरक्षित ठेवा
आपल्या खात्याशी तडजोड झाली असल्यास, खालील अतिरिक्त खबरदारी घ्या:
- आपल्या खात्याशी तडजोड झालेली असताना पोस्ट केलेल्या कोणत्याही अवांछित पोस्ट्स हटवा.
- व्हायरस आणि मालवेअरसाठी आपले कम्प्युटर्स स्कॅन करा, विशेषत: आपण पासवर्ड बदलल्यानंतर अनधिकृत खाते वर्तणूक पोस्ट होत राहिल्यास.
- आपल्या ऑपरेटिंग सिस्टम आणि अनुप्रयोगांसाठी सुरक्षा पॅच प्रस्थापित करा.
- नेहमी मजबूत, नवीन पासवर्ड वापरा जो आपण इतरत्र वापरत नाही आणि ज्याचा अंदाज करणे कठीण असेल.
- द्वि-घटक प्रमाणीकरण वापरण्याचा विचार करा. केवळ पासवर्डवर विसंबून राहण्याऐवजी, लॉगइन सत्यापनामुळे आपण आणि केवळ आपणच आपल्या >x< खात्यामध्ये लॉगइन करू शकता याची खात्री करण्यासाठी दुसऱ्यांदा चेक करणे शक्य होते. हे एक महत्त्वाचे सुरक्षा वैशिष्ट्य आहे जे आपल्या खात्यासाठी अतिरिक्त संरक्षणाचा स्तर जोडते आणि अनधिकृत प्रवेशाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करते.
- खात्याची तडजोड होण्याचा धोका कमी करण्यासाठी सर्वोत्तम पद्धत म्हणून आपली लॉगिन क्रेडेंशियल्स कोणाबरोबरही शेअर करू नका.
आमच्या खाते सुरक्षा टिप्स पृष्ठावर आपणास अधिक माहिती मिळू शकते.
खात्यांशी तडजोड कशी होते?
जर आपण आपले उपभोक्ता नाव आणि पासवर्ड एखाद्या दुर्भावनापूर्ण तृतीय-पक्षाच्या अनुप्रयोग किंवा वेबसाइटवर सुपूर्द केला असेल, जर आपले >x< खाते सहज ओळखण्यायोग्य पासवर्डमुळे असुरक्षित असेल, आपल्या कॉम्प्युटरवरील व्हायरस किंवा मालवेअरवरून पासवर्ड्स संकलित होत असतील किंवा आपण तडजोड झालेले नेटवर्क वापरत असाल तर खात्यांशी तडजोड केली जाऊ शकते.
अनपेक्षित अपडेट्सचा अर्थ नेहमीच असा नसतो की आपल्या खात्याशी तडजोड झाली आहे. कधीकधी, तृतीय-पक्ष अनुप्रयोगामध्ये एखादा बग असू शकतो ज्यामुळे अनपेक्षित वर्तन होते. आपणास विचित्र वर्तन दिसल्यास, आपला पासवर्ड बदलल्याने आणि/किंवा कनेक्शन मागे घेतल्याने अनुप्रयोगाला आपल्या खात्यामध्ये प्रवेश राहणार नसल्याने ते थांबेल.
आपण पोस्ट न केलेले किंवा मंजूर न केलेले अपडेट्स आपल्या खात्यामध्ये दिसत असल्यास शक्य तितक्या लवकर कारवाई करणे उत्तम.